कृष्णाचा रथ शतधन्व्याचा पाठलाग करीत मनोवेगाने निघाला. सासरा हा वडिलांसमान मानला आहे. त्यामुळे त्याला गुरुत्व दिले आहे. त्याचा निर्घृण खून करण्याऱयाला लक्ष करून रथ निघाला. शतधन्वा हा गुरुद्रोही, महापापि÷ आणि आततायी असल्याने त्याला मारल्यास कोणतेही पाप नाही हे जाणून त्याचा पाठलाग करीत रथ निघाला. अनेक प्रदेश पादाक्रांत करीत शतधन्वा पळत होता. त्याच्यापाठी मनोवेगाने कृष्णाचा रथ लागला होता. पहाटेला शतधन्व्याने मागे वळून पाहिले तर त्याला कृष्णाचा गरुडध्वज धारण केलेला रथ दिसला. भीतीने त्याच्या पोटात गोळा आला. तो धावून धावून दमला होता. तो मूर्च्छित होऊन पडला.
मग मिथिलेच्या समीप वनीं । पतित अश्व विसर्जूनी ।
भयसंत्रस्त पळतां चरणीं । देखिला नयनीं श्रीकृष्णें ।
पदातियापाठीं रथ । क्षात्रधर्मासि हें अनुचित ।
म्हणोनि पदाति कृष्णनाथ । होऊनि धांवत तया पृ÷ाrं ।निद्रित मारिला आपुला श्वशुर । यालागिं रोषे जगदीश्वर । कृष्ण सर्वगही साचार । धांवे सत्वर वधावया । शतधन्व्याची भरली घडी । वळती पायांच्या वेंगडी ।
थुंका वाळोनि गेला तोंडीं । भरली हुडहुडी जीवभयें ।
श्रोते शंका करिती येथ । समरविमुखा कृष्णनाथ ।
वधिता जाला हें अनुचित । यदर्थीं शास्त्रार्थ अवधारा ।यतीलागीं सुवर्ण देणें । व्रतस्था ताम्बूल समर्पणें ।
चोरा अभयें संरक्षणें । हीं नरककारणें दात्यातें ।
आततायी देखिल्यावरी । तत्काळ वधावा धार्मिकीं वीरिं । यालागिं जाणोनि वधाधिकारी । वधी श्रीहरि तें ऐका ।थोडय़ा वेळाने सावध होऊन शतधन्वा पुन्हा पळू लागला. मिथिलेच्या जवळ वनात शतधन्वा पळताना कृष्णाने पाहिला. पायाने पळणाऱयावर रथात बसलेल्याने हल्ला करणे छात्रधर्मानुसार योग्य होणार नाही हे जाणून कृष्णही रथातून खाली उतरला व धावत शतधन्व्याचा पाठी लागला. आपला सासरा सत्राजित याला तो झोपेत असता या शतधन्व्याने मारला, याचा कृष्णाला राग आला होता. त्यामुळे तो शतधन्व्याचा वध करायला धावला. शतधन्व्याची मृत्यूची वेळ जवळ आली होती. त्याचे पाय धावून दमले होते. तोंड कोरडे पडले होते व अंगात हुडहुडी भरली होती. तो भीतीने कापत होता. समरातून पळणाऱयाला मारू नये असा दंडक असताना कृष्णाने शतधन्व्यावर प्रहार कसा केला? या प्रश्नाचे उत्तर ऐका- यतीला सुवर्ण देणे, व्रतस्थाला तांबूल देणे, चोराला अभय किंवा संरक्षण देणे ही दात्याला नरकात घेऊन जातात. आततायी दिसल्याबरोबर तात्काळ त्याचा वध करावा असे शास्त्र सांगते. त्यानुसार कृष्णाने काय केले ते पहा-
क्षात्रधर्म शास्त्रानुरूप । पदाति जाला यदुकुळदीप ।
चक्र काढूनियां देदीप्य । वधिला सपाप शतधन्वा ।
निद्रितहंता स्यमंतकचोर । चपें त्याचें छेदूनि शिर ।
वस्त्रांमाजि वारंवार । मणि श्रीधर हुडकितसे ।
मणि ठेविला अक्रूरापासीं । विदित असतांही सर्वज्ञासी । अग्रजाची समजाविसी । कारणें मणीसी धांडोळी । शास्त्राज्ञेनुसार शतधन्वा दिसताच कृष्णाने आपल्या देदीप्यमान सुदर्शन चक्राने त्याचे मुंडके उडवले.
देवदत्त परुळेकर








