प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी रविवारी नवी दिल्ली येथील आपल्या कार्यालयात अधिकाऱयांची बैठक घेतली. सुटीचा दिवस असूनही प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी ही बैठक आयोजित केली होती.
उपनिवासी आयुक्त प्रसन्न एच., विशेष निवासी आयुक्त विजयरंजन सिंग आदी अधिकाऱयांबरोबर चर्चा करून पुढच्या आठवडय़ात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा दिल्ली दौऱयावर येणार आहेत, यासंबंधीची रुपरेषा आखण्यात आली.
कर्नाटक भवनची काही कामे प्रलंबित आहेत. मुख्य सचिव रजनीश गोयल, मुख्य अभियंते शिवयोगी हिरेमठ, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव गुरुप्रसाद यांच्याशी फोनवरून चर्चा करून लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याची सूचना शंकरगौडा यांनी दिली.









