प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधील एक निसर्गसंपन्न परिसर म्हणजे व्हॅक्सिन डेपो. परंतु हा व्हॅक्सिन डेपोच सध्या धोक्मयात सापडला आहे. शहरात सुरू असणाऱया विकास कामांमधील उरलेला कचरा, माती या ठिकाणी टाकून व्हॅक्सिन डेपोचे डंपिंग ग्राऊंड करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे येथील जैवविविधता धोक्मयात सापडली असून, पर्यावरण प्रेमींकडून या प्रकाराचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
यापूर्वीही अनेकवेळा व्हॅक्सिन डेपोचे वैभव कमी करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु पर्यावरणप्रेमींनी तो वेळोवेळी हाणून पाडला आहे. बेळगाव शहराला लागूनच हा परिसर असूनही अनेक प्राणी-पक्ष्यांचा या ठिकाणी वावर आहे. विशेषत: राष्ट्रीय पक्षी असणाऱया मोरांसाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. परंतु याच निसर्गसंपन्न परिसराचा काही जणांनी ऱहास करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
काही महिन्यांपूर्वी व्हॅक्सिन डेपोमधील बेसुमार झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर आता या ठिकाणी बांधकामातील उरलेला कचरा, दगड, विटा, माती यासह इतर साहित्य टाकण्यात येत आहे. ट्रक्टर व डंपरच्या साहाय्याने ठिकठिकाणी ढिगारे ओतण्यात आले आहेत. यामुळे हा परिसर आता गलिच्छ दिसू लागला आहे. याकडे कोणत्याच प्रशासकीय विभागाचे लक्ष नसल्यामुळे येथील जैव तिवविधता धोक्मयात आली आहे.









