ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशात कर्जत बुडालेल्या एका छोट्या व्यावसायिकानं फेसबुकवर लाईव्ह येत विषप्रश्न करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कर्जाला कंटाळून त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यावेळी तिची पत्नी अडवण्याचा प्रयत्न केट होती. मात्र त्याने विष प्राशन केलं. त्यांनतर त्यांच्या पत्नीनेही विष प्रश्न केलं. यामध्ये महिलेचा जीव गेला आहे. राजीव तोमर असं आत्महत्या करणाऱ्या व्यवसायिकाचे नाव आहे.
दरम्यान, बरौत येथील राजीव तोमर नावाच्या या व्यक्तीवर कर्जाचा मोठा डोंगर होता आणि त्याला व्यवसायातही खूप त्रास होत होता, त्यामुळं त्यानं हे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. या घटनेत व्यापारी राजीव तोमर वाचले आहेत. मात्र, त्यांच्या पत्नीला आपला प्राण गमावावा गलाय. राजीव तोमरनंच हा व्हिडिओ शेअर केला असून मी देशद्रोही नाही, देशावर माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाज वाटायला पाहिजे, असं त्यांनी लाइव्ह व्हिडिओत म्हंटलंय. पंतप्रधानांनी आमची सर्व कामं बिघडवली आहेत. मोदींच्या विविध निर्णयामुळं लहान दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय. याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
स्थानिक वृत्तपत्रांनुसार, राजीव तोमर आर्थिक संकटाचा सामना करत होते आणि त्यांच्यावर 32 लाखांचं कर्ज होतं. राजीव तोमर हे कासिमपूर खेडी गावचे रहिवासी असून बरौत येथील सुभाष नगर कॉलनीत राहतात. त्यांचे बावली रोडवरील बरौत येथे बुटांचं शोरूम आहे. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळं छोटे व्यापारी देशोधडीला लागल्याचा आरोप काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष करत आहेत. मोदी सरकारनं ज्या प्रकारे जीएसटी लागू केला, नोटाबंदी लागू केली, त्याचा मोठा फटका छोट्या दुकानदारांना, लघुउद्योगांना बसला असून त्यामुळं ते कर्जबाजारी झाले असून, अनेक जण आत्महत्येसारखं पाऊल उचलत आहेत, असे विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.