वेंगुर्ले /वार्ताहर-
वेंगुर्ला तालुका गिरण मालक संघटनेच्या वार्षिक सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी सौ. आकांशा परब यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्षा आकांक्षा परब यांचे वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी अभिनंदन केले.
वेंगुर्ला तालुका गिरणी मालक संघटनेची वार्षिक सभा वेंगुर्ले नगर वाचनालयाच्या सभागृहात आज सोमवारी पार पडली. यासभेत सर्वप्रथम नुतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. या नुतन कार्यकारीणीत अध्यक्षपदी सौ. आकांक्षा परब, उपाध्यक्षपदी मयूर आरोलकर, खजिनदारपदी सिद्धेश परब तर सचिवपदी भिकाजीराव सावंत यांचीही एकमताने निवड करण्यात आली.
या सभेत दरवाडी संदर्भात निर्णय घेण्यात आला. यात वेंगुर्ले तालुक्यात गावागावात जिथे घरघंटीचा व्यवसायासाठी वापर केला जातो. त्यांच्यावर कारवाही करण्यात आली. याबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या सभेस वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब, सल्लागार दत्तराज (कुमार) कामत, किशोर परब,नूतन अध्यक्ष सौ आकांशा परब, मयूर आरोलकर, भिकाजीराव सावंत, किशोर वालावलकर, शंकर परब, संदीप बेहेरे, प्रवीण परब, स्वप्नील परब, सिध्दी नाईक, सचिन सामंत, ज्ञानेश्र्वर पडवळ, ज्ञानदेव पेडणेकर, शेखर गावडे, व इतर तालुक्यातील गिरण मालक उपस्थित होते









