प्रतिनिधी/ बेळगाव
वीरमदकरी जयंती दिनी सरकारी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी वीरमदकरी संघटनेने जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. शुक्रवारी या संबंधी जिल्हाधिकाऱयांमार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले आहे.
13 ऑक्टोबर रोजी वीरमदकरी जयंती आहे. देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. श्रीरंगपट्टणजवळ त्यांचे स्मारक उभारण्यात यावे. चित्रदुर्ग येथे थीमपार्क व्हावे, बेळगावातही त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष आनंद शिरुर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









