वार्ताहर / सावंतवाडी:
मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याच्या कालावधीचे वीज मीटर रीडिंग कोरोना पार्श्वभूमीवर घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पूर्वीच्या महिन्यात जेवढे वीज बिल येत होते, त्यानुसार या तीन महिन्यांची सरासरी बिलाची रक्कम ग्राहकांनी भरावी, असे मेसेज मोबाईलवर येत आहेत. त्यामुळे वीज ग्राहक दोन महिन्यांची बिले भरणा करत आहेत. तीन महिन्याचे रीडिंग एकाचवेळी घेतल्यास ग्राहकांना भरमसाठ बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे वीज वितरणने यावर पर्याय काढावा, अशी मागणी होत आहे. वीज वितरणचे अधिकारी यादव यांनी सांगितरे की, ‘कोरोना’मुळे रीडिंग घेणे बंद आहे. वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यानंतर रीडिंग घेण्यात येईल.









