वृत्तसंस्था/ चेनाई
मलेशियातील कौलालंपूर येथे 15 ते 20 डिसेंबर दरम्यान होणाऱया महिलांच्या विश्व सांघिक स्क्वॅश स्पर्धेतून भारताने माघार घेतल्याची माहिती अखिल भारतीय स्क्वॅश संघटनेने दिली आहे.
सध्या संपूर्ण जगात कोरोनाची परिस्थिती बिकट होत असल्याने विदेशात जाण्याकरिता हवाई प्रवास धोक्याचा ठरत आहे. तसेच या स्पर्धेसाठी भारतीय महिला स्क्वॅश संघाला तयारीकरिता पुरेसा कालावधीत मिळालेला नसल्याने भारतीय महिला स्क्वॅश संघ या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे अखिल भारतीय स्क्वॅश फेडरेशनचे सरचिटणीस आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक सायरस पोंछा यांनी सांगितले. भारतीय महिला स्क्वॅशपटूंशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.









