वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढीलवर्षीच्या ऑगस्टमध्ये स्पेन येथे होणाऱया विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळापत्रकामध्ये पुन्हा फेरबदल करण्यात आला असून या नव्या वेळापत्रकानुसार सदर स्पर्धा 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान घेतली जाणार असल्याचे आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
2021 ची विश्व बॅडमिंटन स्पर्धा आणि टोकियो ऑलिंपिक स्पर्धा यांच्या तारखा एकाचवेळी येत असल्याने पुन्हा विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला. या संदर्भात विश्व बॅडमिंटन फेडरेशन आणि स्पेन बॅडमिंटन फेडरेशन यांच्यात चर्चा झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. आता विश्व बॅडमिंटन फेडरेशनची 2021 च्या ऑगस्टमध्ये होणारी विश्व बॅडमिंटन स्पर्धा आता 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान घेतली जाणार आहे. सदर स्पर्धा प्रत्येक वर्षी भरविली जाते. यापूर्वी ही स्पर्धा ऑलिंपिक वर्षांच्या कालावधीत भरविली गेली नव्हती पण सध्या 2020 ची टोकियो ऑलिंपिक स्पर्धा कोरोना महामारीमुळे एकवर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आली आहे. त्यामुळे ऑलिंपिकच्या वर्षांमध्ये विश्व बॅडमिंटन स्पर्धा पुढीलवर्षी होणार आहे.









