तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड
विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक यांची व उपाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी, तहसीलदार गणेश शिंदे, सहायक उपनिबंधक डि एस खत्ताळ हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी नुतन अध्यक्ष आमदार नाईक म्हणाले, विश्वासराव नाईक सहकारी कारखान्याने सभासदांचा विश्वास जपला आहे. योग्य कारभाराबरोबरचं योग्य टेक्नॉलॉजीचा वापर करत सहविजनिर्मितीसह मद्यनिर्मिती प्रकल्प उभारून शेतकर्यांच्या ऊसाला एफआरपीसह योग्य भाव देण्यासाठी कायमचं प्रयत्नशील आहे. सुरवातीला कारखान्याची गाळप क्षमता २५००टन होती. ती गाळप क्षमता आज ५३००पर्यंत केली आहे. तर पुढील वर्षी पर्यंत कारखान्याची गाळप क्षमता ६००० पर्यंत करणारं असून सभासद व ऊस उत्पादक यांच्या विश्वासास पात्र राहण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार.
सन २००० पासून सलग पाचव्यांदा आमदार मानसिंगराव नाईक यांनी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.यावेळी नुतन संचालक मंडळातील विराज नाईक, बाबासो पाटील, सुरेश पाटील, विश्वास कदम, राजाराम पाटील, यशवंत निकम, संभाजी पाटील, शिवाजीराव पाटील, विष्णू पाटील, बाबासाहेब पाटील, अजितकुमार पाटील, हंबीरराव पाटील, यशवंत दळवी, तुकाराम पाटील, बाळासो पाटील, संदीप तडाखे, कोमल पाटील, अनिता चौगुले, सुहास पाटील, बिरु आंबरे उपस्थित होते.
सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने लोकनेते फतेसिंगराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले
कार्यक्रमास माजी आमदार सत्यजित पाटील, राजेंद्रसिंह नाईक, माजी सभापती सम्राटसिंह नाईक, दिनकर पाटील, मानसिंग पाटील, शिवाजीराव घोडे, प्रमोद नाईक विवेक नाईक, शाहू नाईक, सुरेश चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती मनिषा गुरव, तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वास पाटील, कोंडीबा चौगुले सचिन पाटील आदी उपस्थित होते.