दक्षिण कोरियामध्ये विवाहादरम्यान वराला उलटं लटकवून मारहाण केली जाते. सर्वप्रथम वराचे मित्रच त्याच्या पायांमध्ये एक काठी बांधून त्याला उलटं लटकवित असतात. त्यानंतर नियोजित वराला काठीने मारहाण केली जाते. काही लोक चप्पल-बुटांनीही देखील वराला मार देत असतात. याचबरोबर काही लोक वराला कॉर्विना माशाद्वारे देखील मारत असतात. या मारहाणीत विशेष बाब म्हणजे काठी, चप्पलेद्वारे वराच्या केवळ तळव्यांवरच मार दिला जात असतो. दक्षिण कोरियात अशाप्रकारचा मार सहन केल्यावरच वैवाहिक आयुष्यास सुरुवात करता येते.

वराला मारहाण करण्याच्या प्रथेत वधू पक्षाचा कुठलाच सदस्य सामील होत नाही. ही मारहाण केवळ वराचे मित्र आणि नातेवाईकच करू शकतात. दक्षिण कोरियात या विचित्र प्रथेचे आजही पालन केले जाते. दक्षिण कोरियाचे लोक विवाहावेळी या प्रथेचे पूर्ण उत्साहात पालन करत असतात. वर या प्रथेत उत्तीर्ण झाल्यास त्याच्या वैवाहिक आयुष्यात फारच कमी अडचणीत येतील असे दक्षिण कोरियातील लोकांचे मानणे आहे. या प्रथेदरम्यान वराला सातत्याने प्रश्न विचारले जात असतात. या प्रथेच्या माध्यमातून शांतपणे मार खाणारा वर स्वतःच्या होणाऱया वधूसमोर पौरुषत्व सिद्ध करत असल्याचे दक्षिण कोरियाच्या लोकांचे मानणे आहे. या प्रथेमुळे दोघांच्याही वैवाहिक जीवनात कुठल्याच अडचणी येणार नाहीत, पूर्वीच मार खाऊन आयुष्यभरासाठी वर मजबूत होत असतो असे तेथील लोकांचे मानणे आहे. परंतु आता ही प्रथा केवळ मनोरंजनात्मक स्वरुपात पार पाडली जात आहे.









