नवी दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाची लागण वाढू नये म्हणून हवाई क्षेत्रातील कंपन्यांनी विमानातील प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा आणली होती. मध्यंतरी सरकारने प्रवाशांची क्षमता 60 टक्के इतकी केली होती पण आता यात बदल करून प्रवासी संख्या एकूण क्षमतेच्या 70 टक्केपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात विमान प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली असल्याने ही वाढ लक्षात घेता व घटती कोरोना रुग्णसंख्या पाहून सरकारने क्षमता वाढीबाबत निर्णय घेतला आहे.









