प्रतिनिधी / टोप
हातकणंगले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक कार्यक्रमावर तसेच विनामास्क फिरणार्यावर कडक कारवाई करावी असे आदेश हातकणंगलेचे गटविकास आधिकारी अरुण जाधव यांनी ग्रामपंचायतीना दिले आहेत. त्यांनी पंचायत समिती विस्तार आधिकारी यांच्या समवेत ग्रामपंचायत कार्यालयाला भेटी दिली. यावेळी त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.
सध्या कोरोऩा रुग्णाची वाढती संख्या पाहता. अशंता.. लॉकडाऊन शिथिल केल्याने विना मास्क फिरणार्याची संख्या वाढली आहे. यामुळे दंडात्मक कारवाई करावी. ग्रामपंचायतीने ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची नोंद ठेवणे. त्याची नियमित तपासणी करणे. लक्षणे आढळल्यास वैद्यकीय आधिकाऱ्यांच्या मार्फत त्वरीत उपचार करणे तसेच ग्रामपातळीवरचे सर्व कर्मचार्यांनी दक्ष राहावे असे अरुण जाधव यांनी सांगितले. सार्वजनिक सभा संमेलने घेण्यावर पूर्ण बंदी आहे.

विवाह समारंभाना परवानगी घेतली असेल तर काटेकारेपणे सोशल डिस्टंन्स ठेवणे गरजेचा आहे. बाहेरगावाहून येणार्या लोकांची स्वंतत्र नोंद ठेवावी. ग्रामपंचायतीने वारंवार जंतुनाशकाची फवारणी करावी. गावात कोरोना रुग्ण आढऴल्यास ग्रामपंचायतीने तो भाग सील करावा. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची तात्काळ तपासणी करावी. तालुक्यातील ग्रामपंचायतीनी यांची अमलबजावणी करावी असे अरुण जाधव यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती विस्तार आधिकारी एस. जे. पोवार, एन. आर. रामाण्णा ग्रामविकास आधिकारी डी. आर. देवकाते, अशोक मुसळे आदि उपस्थित होते.








