सावंतवाडी:
विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला पिंगुळी येथील संदीप गोपाळ पिंगुळकर याला जिल्हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती संशयित संदीप पिंगुळकर याचे वकील शिवराम कांबळे यांनी दिली.
विनयभंगप्रकरणी पोलीस यंत्रणेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, विरोधी गटाविरोधात मारहाण व ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल केला असताना त्यानी अटक व त्याच्याविरुद्ध न्यायालयात अद्यापपर्यंत दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत पिंगुळकर याने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत संदीप पिंगुळकर याने पोलीस महासंचालक व पोलीस अधिकाऱयांकडे कुडाळ पोलिसांच्या भूमिकेबाबत न्याय मिळावा, यासाठी तक्रार केली आहे, अशी माहिती ऍड. कांबळे यांनी माहिती दिली.









