ऑनलाईन टीम / तरुण भारत
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील मातबर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर विजय आपलाच होणार असल्याचा दावा दोन्ही गट करत आहेत. यामुळे विधानपरिषद निवडणूकीच्यानिमित्ताने राजकिय वातावरण ही तापू लागले आहे. याच पार्श्वभुमीवर विधान परिषदचे अर्ज छाननीनंतर पारंपारिक विरोधी गट महाडिक व पाटील गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.ही घटना आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे घडली आहे.
जमाव बंदीचा आदेश जुगारून सतेज पाटील व अमल महाडिक यांच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी गर्दी केली होती. . यावेळी दोन्ही गट आमने – समाने आल्याचे समजताच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले आहे. मात्र या प्रकारामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.