बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानपरिषदेचे अध्यक्ष प्रतापचंद्र शेट्टी यांनी गुरुवारी राजीनामा दिला. विधानपरिषदेत भाजप आणि जेडीएस एकत्र आले आहेत. त्यामुळे जेडीएसला सभापती पद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कर्नाटक विधानपरिषदेने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यपाल वजुभाई वाला यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख म्हणून मंगळवार ९ फेब्रुवारी निश्चित केल्याचे म्हंटले आहे.
८ फेब्रुवारी रोजी रात्री १२. च्या आधी कोणत्याही सभासदाला कक्ष क्रमांक: १५६-सी, प्रथम मजला, विधान सौध, बेंगळूर येथील सेक्रेटरीला उद्देशून पत्राद्वारे अर्ज दिली जाऊ शकतो, तेंव्हा अध्यक्ष म्हणून दुसर्या सभासदाची निवड केली जाईल आणि या सूचनेनंतर तिसर्या सदस्याने अर्ज सादर केला तर त्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि यातून सभापती म्हणून एकाची निवड केली जाईल असे म्हंटले आहे.









