चापगाव येथील शिक्षणप्रेमीचा उपक्रम : कन्येच्या वाढदिवसाचे साधले औचित्य
वार्ताहर / चापगाव
खानापूर तालुक्मयातील चापगाव येथील सरकारी कन्नड हायर प्राथमिक शाळेला येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नागराज येळ्ळूरकर यांनी आपली कन्या कुमारी ललिता हिच्या 13 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला रेल्वेचा लूक देणारा कलर देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. नागराज हे चापगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य असून त्यांनी यापूर्वीही शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी पुढाकार घेतला आहे.
मागीलवषी आपली द्वितीय कन्या लक्ष्मी हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी हायर प्राथमिक शाळेला रेल्वेचा लूक देणारा कलर देऊन आदर्श निर्माण केला होता. त्याचप्रमाणे यावषीही कन्नड शाळेला त्यांनी रेल्वेचा लूक देणारा रंग दिलेला आहे. शिवाय कन्नड शाळेच्या समोरील भागाला स्लॅब घालून देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. नागराज हे एक उमदे व्यक्तिमत्त्व असून त्यांची शैक्षणिक कार्याची आवड लक्षात घेता, येथील मलप्रभा हायस्कूल शाळेलाही कलर देण्याची हमी दिली आहे.
यावेळी नागराज येळ्ळूरकर यांच्या या कार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मादीगार, सहशिक्षक यमोजी यांनी अभिनंदन केले. त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
शाळेचा आदर्श राखा… लहानपणी प्रतिकूल परिस्थितीमुळे मला उच्च शिक्षण घेता आले नाही. त्यावेळी शिक्षणाचे महत्त्व कळलेच नाही. पण आता त्याची जाण झाली असून गावातील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटावे, शाळेचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून विद्यार्थ्याने उच्च शिक्षण व शिक्षकांनी गुणात्मक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा, यासाठी कन्येच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेला आगगाडीचा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पालकाने शाळेचा आदर्श राखावा व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित बनवावे, असे विचार त्यांनी यक्त केले.









