वृत्तसंस्था/ नागपूर
कोरोना व्हायरस महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असून नागपूर शहरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे केवळ आयपीएल स्पर्धाच नव्हे तर विदर्भच्या क्रिकेटपटूंचे निश्चित ठरलेले विवाहदेखील लांबणीवर टाकण्यात आले आहेत.
विदर्भचे क्रिकेटपटू अष्टपैलू आदित्य सरवटे, यष्टीरक्षक फलंदाज अक्षय वाडकर आणि मध्यमगती गोलंदाज रजनीश गुर्बानी यांचे विवाह निश्चित झाले होते. आदित्य सरवटे आणि अरूणीता यांचा विवाह 27 एप्रिलला तसेच वाडकर आणि गुर्बानी यांचे विवाह अनुक्रमे 2 आणि 18 मे रोजी निश्चित केले होते. आता या क्रिकेटपटूंचे विवाह समारंभ लांबणीवर टाकण्यात आले आहेत. वाडकरचा विवाह श्रुतिकाशी होणार आहे.









