जीएसटी दर वाढल्यामुळे मोबाईल उद्योगावर 15 हजार कोटीचे ओझे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यामध्ये विविध उद्योगधंद्यासोबत अन्य व्यापारी उलाढाली ठप्प पडल्या आहेत. यातच ज्यांनी वाहन आणि आरोग्याचे विमा संरक्षण विकत घेतले आहेत. त्यांना मात्र आपला महिन्यांचा हप्ता कधी भरावयाचा याबाबत चिंता लागून राहिलेली आहे. मात्र संबंधीत विमाधारकांनी या बाबत काळजी करण्याची गरज नाही आहे. कारण सरकारकडून मोटार आणि आरोग्य विम्यांचे हप्ते लॉकडाउन संपल्यानंतर 7 दिवसांची सवलत देण्यात आल्याचे सांगितले आहे.
अर्थमंत्रालयाकडून यासंदर्भात एक परिपत्रक सादर केले असून त्यात म्हटले आहे. की ज्यांना तिसऱया पार्टीचा वाहन विम्या हप्ता भरावयाची तारीख लॉकडाउनच्या काळात 25 मार्च ते 14 एप्रिल याच्या दरम्यान येत असल्यास त्या विमाधारकांनी आपला हप्ता 21 एप्रिल रोजी जमा करता येणार आहे. परंतु या बंदच्या काळत कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्या येणार नाही. तसेच आरोग्य विम्याचा हप्ता भरण्यासाठीही 21 एप्रिलपर्यंत सवलत दिली आहे. या निर्णयामुळे विमाधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.









