प्रतिनिधी / वास्को
वास्कोतील त्या चर्चच्या आणखी एका धर्मगुरूसह त्यांच्या दोघा पदाधिकाऱयांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. धर्मगुरूच्या संपर्कात आलेल्या अन्य अनेकांचे तपासणी अहवाल अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. मांगोरहिल भागातील कंटेन्मेंट झोनमधील कोरोना बाधीतांची संख्याही वाढल्याची माहिती मिळाली. या वस्ती अद्यापही नागरिकांच्या लाळेचे नमुने गोळा करण्यात येत आहे.
वास्कोतील एका चर्चच्या फादरला कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी उघडकीस आले होते. त्यामुळे या चर्चच्या परीसराचे निर्जंतुकीकरण करून त्या फादरच्या संपर्कात आलेल्या साधारण वीस लोकांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी अवघ्या काही लोकांचे तपासणी अहवाल आलेले आहेत. त्यात तिघांचे अहवाल पोझिटीव्ह आलेले आहेत. त्यात चर्चच्या अन्य एका फादरचा समावेश असून चर्चशी संबंधीत दोघा पदाधिकाऱयांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.
नवेवाडे भागातील कोरोना रूग्णांची संख्या अकरा झाल्याची व बायणातील कोरोना रूग्णांची संख्या पंधरा झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. मांगोरहिल व मांगोरहिलशी संबंधी कोरोना रूग्णांची संख्या आता तीनशेहून अधिक झालेली आहे. मांगोरहिल भागातील कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची तपासणी करून कोविड चाचणीसाठी त्यांच्या लाळेचे नमुने गोळा करण्याचे काम आरोग्य खात्याच्या पथकाकडून अद्यापही करण्यात येत आहे. कंटेन्मेंट झोनमधील मोठय़ा वस्तीत अद्याप एकही कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही. या वस्तीला कंटेन्मेंट झोनमधून मुक्त करण्याची मागणी स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा व या वस्तीतील लोकांनी केली होती. परंतु सरकारने ही मांगणी अद्याप गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही.
कोरोनाच्या भितीमुळे वास्को शहरातील व्यवहार थंडावले होते. गुरूवारपासून त्यात सुधारण झाली. मात्र शहरात वर्दळ कमी आहे. आज शनिवारपासून शहरातील भाजी मार्केट खुले होणार आहे. त्यामुळे पुन्हा गजबज वाढणार आहे. या मार्केटमध्ये सर्वांधीक गोंधळ आणि गर्दी पडत असल्याने आतापर्यंत या ठिकाणी सामाजीक अंतराच्या नियमांचा फज्जा उडत आलेला आहे. आजपासून पुन्हा वास्कोत अशीच परिस्थिती उद्भभवण्याची शक्यता आहे.
प्रवासी बसगाडय़ांमध्ये नियमांचे उल्लंघन करून अधिक प्रवासी
दरम्यान, वास्कोतील काही प्रवासी बसगाडय़ांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रार वाढत आहेत. बसमध्ये मोजकेच प्रवासी असावेत असा कडत नियम असला तरी बऱयाच वेळा विशेषताह वास्को ते वेर्णा मडगाव या मार्गावरील बसगाडय़ांमध्ये प्रवाशांची गर्दी पडत असल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रकार कोरोना प्रसाराच्या दृष्टीने घातक असल्याने अशा प्रवासी बसगाडय़ांविरूध्द कारवाईची मागणी होत आहे. कोरोनाच्या भितीमुळे वास्कोतील प्रवासी सिटी बस व्यवसाय पार कोलमडलेला असून या बसगाडय़ांना प्रवासी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे थोडेच बस व्यवसायीक बसीस घेऊन रत्स्यावर उतरलेले आहे. त्यातच काही बसगाडय़ा सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून अधिक प्रवासी घेत असल्याने इतर बसगाडय़ांना प्रवाशांवीना धावावे लागते. असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे.









