वार्ताहर / घुणकी
किणी ता. हातकंणगले येथील वारणा नदीकाठच्या १० ते १५ शेतीपंपाच्या केबल वर(वायर) चोरट्यांचा डल्ला. शेतकऱ्यांना मोठा आर्थीक फटका बसला आहे. केबल चोरीचे प्रकार वारंवार घडत असुन चोरट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
वारणा नदीवर शेतीच्या पाणी पुरवठा साठी शेतकऱ्यांनी विद्युत मोटारपंप बसविण्यात आले आहेत या पंपाच्या विद्युत पुरवठासाठी बसविण्यात आलेल्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला असुन महापूरानंतर झालेली मोडतोड हजारो रूपये खर्च करून शेती पंपाची दुरूस्ती करून घेतली आहे. गहू , हरभरा, सह ऊसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावधाव सुरू असताना भारनियमनाच्या दरम्यान रात्री वेळेस विद्युत बंद असलेल्या दरम्यान वारणा नदीकाठच्या जॅकवेल ते गाडीबेट नावाने परिचित असलेल्या भागातील सुमारे दहा ते पंधरा विद्युत शेतीपंपाच्या केबल चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.
यामधील तांब्याच्या तारा काढुन विकण्यासाठी केबल चोरीचे प्रकार घडत असल्याने शेतकरी हैराण झाले असुन शेतकरी अडचणीत असतानाच वारंवार अश्या प्रकार घडत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त कराव अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्यावतीने पेठवडगाव पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.