कुपवाड / प्रतिनिधी
वारणाली येथे उभारणाऱ्या महापालिकेच्या बहुचर्चित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामास गतीने सुरुवात झाली आहे. या ठिकाणी बुधवारी आयुक्त नितीन कापडणीस व राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णु माने यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली.
यावेळी नागरिकांच्या अरोग्याचे हित लक्षात घेऊन हॉस्पीटलचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सुचना आयुक्तांनी ठेकेदार अभय पाटील यांना दिल्या. यावेळी नगरअभियंता पांडव, नगररचनाकार आर.व्ही काकडे, शाखाआभियंता आलताफ मकादांर, अशोक कुंभार उपस्थित होते.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या जागेविरोधातील दाखल झालेल्या दोन्हीही याचिका न्यायालयाने फेटाळल्याने हॉस्पिटल उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे हॉस्पीटल उभारणीच्या कामास चांगली गती लागली असून सध्या लाईटच्या व्यवस्थेसंह मुरुमीकरण करून शेड उभारले जातआहे. भूमिपूजन पुढील आठवड्यात होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णु माने यांनी यावेळी बोलताना सांगितले. हॉस्पिटल उभारणीसाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. हॉस्पिटलच्या बांधकामाचे टेंडर ५ कोटींचे असून ५० बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.