प्रतिनिधी/ सातारा
शहरातील मोतीचौक ,खणआळी, राजपथ, कर्मवीर पथ या मार्गावरील फुटपाथ होणारी पार्किंग, दुकानाचे अतिक्रमण, पार्किंग मध्ये किरकोळ विक्रेत्यांची दुकाने यामुळे गेल्या काही दिवसापासून शहरात अतिक्रमणाचा बोजबारा उडला होता. यांचा नाहक त्रास पाद्चाऱयांना सोसावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यानंतर गुरूवारी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी या अतिक्रमणावर कारवाई केली.
राजपथावरील फुटपाथ वर दुकानदारांकडून फुटपाथ वर होणारी पार्किंग आणि किरकोळ व्यावसायिकांची फुटपाथ वरील दुकाने याचा मुळे पद्चाऱयासाठी फुटपाथ वरून चालणे अवघड झाले होते. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या अतिक्रमणात पुन्हा वाढ झाली. साताऱयातील काही वृद्ध नागरिकांनी समक्ष व पत्रे लिहून या बाबत तक्रारी ही केल्या होत्या. तर कर्मवीर पथावरील मोती चौक ते शनिवार चौक या ठिकाणी पार्किंग जागेत दुकानदारांनी आपली दुकाने थाटली होती.
या संपूर्ण प्रकारामुळे या मार्गावर दुचाकी पार्किंग करण्यासाठी लोकांना जागाच उरली नाही. वाहनांची संख्या वाढल्याने दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. विक्रेत्यांचा मनमानी करभार वाढल्याने यांचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. पार्किंगला जागा न मिळाल्याने गाडी नो पार्किंगमध्ये उभी केल्यास नाईलाजाने 300 रूपयांचा दंड भरावा लागत आहे. या बाबत लोकांनी आणि माध्यमांनी संबंधित विभागाचे लक्ष वेधल्यानंतर गुरूवारी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी कारवाई करत रस्त्यावरील दुकानदारांना सूचना करून फुटपाथ आणि पार्किंग मधील दुकाने हटविली. मात्र करवाईच्या काहीचा तासानंतर पुन्हा परिस्थिती जै से थे झाली. यामुळे पोकळ कारवाया न करता ठोस करवाईची मागणी नागरिकांच्यातून होत आहे.









