दानशूरव्यक्तींच्यासहकार्यानेवाईपोलिसांनीराबवलाउपक्रम
शिवाजीराव जगताप / वाई
केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे वाई पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी अवघे शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणायचे प्रयत्न केले अन त्यास यश मिळाले.गतवर्षी 2 सप्टेंबरला वाई शहरात बसवलेल्या 32 कॅमेयाचे लोकापर्ण कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्या हस्ते करण्यात आले.वर्षभरात गुह्यांना लगाम बसला आहे.वाई पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमाचे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कौतुक केले आहे.
वाई शहर हे ऐतिहासिक शहर कृष्णा नदी काठी आहे.काळाप्रमाणे वाई शहरात मूळचे स्थानिक आणि बाहेरून येणायांची अशी सरमिसळ आहे. पर्यटन स्थळ असल्याने वाईच्या गणपतीला अनेक लोक येतात.पर्यटन क्षेत्र असल्याने आपोआप गुन्हे घडण्यामध्ये प्रमाण होते.वाई शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व पोलीस विभागीय अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनानुसार वाई शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याकरता पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी प्रयत्न सुरू केले.वाई शहरातील दानशूर नागरिकांनी स्वयंप्रेरणेने मदत केली.सुमारे 12 लाख रुपये खर्च करून शहरात मुख्य ठिकाणी उच्च प्रतीचे कॅमेरे बसवण्यात आले.32ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आल्याने वाई शहरातले सिनेमा ग्रह, किसन वीर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, भाजी मंडई असा परिसर कॅमेयात आला.अगदी वाहतुकीची कोंडी जरी झाली तरी पोलीस ठाण्यातून माईक वरून लगेच त्या ठिकाणी अलौन्स करून सूचना दिल्या जातात.वाहतुकीला अडथळा करणाया वाहनांवर लगेच कारवाई केली जाते.मारामाया, छेडछाड, दुचाकी चोरी अशा घटना कमी झाल्या आहेत.
वाई शहराची सुरक्षितता महत्वाची
वाई शहरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनानुसार बसवण्यात आले आहेत.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाई शहरावर सीसीटीव्हीचा नजर असल्याने गुन्हेगारीला आळा बसला आहे.








