प्रतिनिधी/ पेडणे
गेले चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने ओहळाला मोठय़ा प्रमाणात आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने वळपे – विर्नोडा येथे चांदेल पाणी प्रकल्पातून पेडणे तालुक्मयात येणाऱया पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईनच वाहून गेल्याने तालुक्मयाला भर पावसातच पाणी गायब झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
चांदेल येथील पाणी प्रकल्पाचे पाणी पेडणे तालुक्मयात सर्वत्र पुरविण्यात येते. या प्रकल्पाची पाण्याची मुख्य वाहिनी ही विर्नोडा येथून राष्ट्रीय महामार्गा जवळून ओहळा जवळून पेडणेला गेली आहे. या वाहिनीतून जाणारे पाणी पेडणे तालुक्मयातील विविध भागात उभारण्यात आलेल्या टाकीत सोडले जाते. ही पाण्याची पाईप लाईन मुख्य पाईप लाईन आहे. माञ गेले चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने डोंगराळ भागातील पाणी हे मुख्य ओहळाला येते. वळपे विर्नोडा ज?क्शन जवळ हे पाणी मोठय़ा प्रमाणात साठते. सध्या राष्ट्रीय महमार्गाचे काम विर्नोडा येथे गेल्या काही महिन्यापूर्वी केल्याने आणि हे पाणी जाण्यासाठी कंञाटदार यांनी योग्य ती उपाययोजना न केल्याने पाण्याची पातळी विर्नोडा येथे तळय़ाच्या ठिकाणी वाढल्यामुळे डोंगराळ भागातून येणाऱया पाण्याच्या प्रवाहाने या भागातून जाणारी पाण्याची पाईप लाईन वाहून गेली.
ड़ वळपे येथे पाण्याची पाईप लाईन काढण्यासाठी जेसीबी यंञ तसेच पेन आणून पाण्यातून पाईप काढण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती विर्नोडा पंचायतीचे सरपंच प्रशांत राव यांनी दिली. पाण्याचा स्ञोत मोठा असल्याने या ठिकाणी पाईट लाईन घालता येणे शक्मय नसल्याचे त्यानी सांगितले. त्यासाठी पाणी विभागाने सदर पाईप लाईन ही ! दुसऱया मार्गाने वळवावी लागणार असून जोपर्यंत पाण्याचा प्रवाह कमी होत नाही तोपर्यंत पाईप वाहिनी जोडता येणार नाही असे सरपंच प्रशांत राव म्हणाले.
ड़ कंञाटदाराचा निष्काळजीपणामुळे ही पाण्याची मुख्य पाईप लाईन वाहून गेलीः माजी सरपंच सीताराम परब
राष्ट्रीय महामार्गाच्या कंञाटदार यांनी विर्नोडा ज?क्शनवर ज्या ठिकाणी पिढय़ान पिढय़ा पाण्याची तळी होती ती मातीचा भराव टाकून बुजविण्यात आली आहे.या ठिकाणी संपूर्ण विर्नोडा गावाला शेतीला पाण्याचा स्ञोत होता तो बंद केला पाणी जाण्यासाठी वेगळी वाट ठेवणे गरजेचे होते ती न ठेवल्याने हे पाणी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जमा झाला व या ठिकाणाहून जाणारी चांदेल पाणी प्रकल्पाची पाईप लाईन वाहून गेली याला सरकारी यंञणा आणि संबंधित कंञाटदार यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे असे विर्नोडा पंचायतीचे माजी सरपंच अ?ड. सीताराम परब यांनी सांगितले .
ड़ पाण्यासंबधीची तक्रार विर्नोडा पंचायत आणि उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी यांना आपण मे महिन्यात दिली होतीः सीताराम परब
सीताराम परब म्हणाले वळपे विर्नोडा ज?क्शन जवळ पाण्याची पुरातन तळी आहे या ठिकाणी असलेल्या तळी व झरे यांचा पाणी स्ञोत हा विर्नोडा गावासाठी मुख्य भुमिका निभावता आहे.हा झरा राष्ट्रीय महामार्गामुळे बंद करण्यात आला ..यासंबंधी आपण पंचायतीला 5 मे रोजी लेखी तक्रार करुन भविष्यात होणाऱया समस्या मांडली होती. त्यानंतर 25 मे रोजी उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे पावसाळय़ातआणि भविष्यात वळपे येथे होणाऱया समस्या मांडल्या होत्या. आपण दिलेल्या पञावर सरकारने विचार केला असता तर आज पाण्याची पाईप लाईन वाहून जाण्याची वेळ आली नसती असे सीताराम परब यांनी सांगितले .
दरम्यान वळपे विर्नोडा येथे पाण्याची पाईप लाईन वाहून गेल्याची माहिती पेडणे पाणी विभाग कार्यालयाचे सहाय्यक अभियंते श्री .वाल्सन यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच जेसीबी व पेन याठिकाणी पंचायतीच्या सहकार्याने आणली.









