मुंबई/प्रतिनिधी
महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे चित्र काही केल्या दिसत नाही. आज, रविवारी (दि.3) सकाळी वर्धा जिल्ह्यातील प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेची माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वर्धा पोलीस अधीक्षक बस्वराज तेली यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून आरोपीला कडक शिक्षा होण्याच्या दृष्टीने पिडीत मुलीचा जबाब घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
यावेळी गोऱ्हे म्हणाल्या की, ज्या वेळी प्रेम संबंधात किंवा कोणी व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतात आणि पुन्हा काही कारणाने विभक्त होतात अशा वेळी त्यांची सुरक्षा आणि समुपदेशन होणे गरजेचे असते असे मत गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केले. या घटनेतील आरोपी हा विवाहित असून त्याने ह्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला. पिडीतेला नागपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अशा घटना थांबण्यासाठी सरकारने घटना जलद गती न्यायालयात चालवण्यात यावे. तसेच प्रलंबित खटल्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी सरकारला सूचना केल्या.