प्रतिनिधी / पेठ वडगाव
कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमध्ये वडगाव शहरात या लॉकडाऊनची शिथिलता केल्यानंतर नागरिक विना मास्क मोटरसायकल व चालत फिरू लागल्याने पालिका प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई केली. या कारवाईमुळे नागरिकांची पळताभुई थोडी झाली. लॉकडाऊन कालावधीत व्यापारी – व्यावसाईकांना दिलेली शिथिलतेचा गैरफायदा नागरिकांनी घेवू नये असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
वडगाव पालिकेने गेल्या दोन दिवसापासून व्यापारी व्यावसाईकांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अत्यावश्यक सेवे व्यतिरीक्त अन्य दुकानाना सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही नागरिक, व्यापारी, व्यावसाईक यांनी याचा गैरफायदा घेत विनामास्क फिरणे, सोशल डीस्टन्स न ठेवणे असे प्रकार सुरु केले आहेत. पालिका प्रशासनाने यामुळे अशा नागरिकांवर कारवाई सुरु केली आहे. विनामास्क फिरणे, व्यवसायास परवानगी नसताना व्यवसाय सुरु ठेवणे. अशा नागरीक, व्यावसाईकावर दंडात्मक कारवाई पालिका प्रशासनाने सुरु केली आहे. दिवसभरात अनेक वाहनावर, व्यापारी, दुकानदारावर प्रशासनाने कारवाई केली. दरम्यान पालिका प्रशासनाने कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसून व्यापारी – व्यावसाईकांच्या सोयीसाठी प्रशासनाने दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेवू नये. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करावे. अन्यथा कोरोणाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकानी सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.








