बेळगाव : शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून…. अरुण दाते यांनी 60 वर्षांपूर्वी या गीताला स्वर दिला. आजही या गीताची मोहिनी टिकून आहे. स्पर्धांमध्ये स्पर्धक गायक हमखास हे गीत सादर करतात. या गाजलेल्या गीताच्या 60 व्या वर्षातील पदार्पणानिमित्त लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र आयोजित ‘नवा शुक्रतारा’ हा काव्यात्मक कार्यक्रम शनिवार दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे होणार आहे.
नव्या ओढीचा, नव्या गोडीचा, नव्या पिढीचा, ‘नवा शुक्रतारा’ मध्ये अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांची ‘स्वरगंगा’ अनुभवता येणार आहे. कार्यक्रम विनामुल्य असला तरी अतिथी प्रवेशिकेशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. एका प्रवेशिकेवर एकाच व्यक्तीस प्रवेश मिळेल. अतिथी प्रवेशिका लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे मुख्यालय, गुरुवारपेठ, टिळकवाडी, लोकमान्य रंग मंदिर बेळगाव येथे उपलब्ध असून रसिकांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.









