प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बेळगावतर्फे रविवार दि. 27 रोजी मराठी भाषा दिनानिमित्त रक्तदान शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य रंगमंदिर येथे सकाळी 9 ते 1 यावेळेत रक्तदान शिबिर होणार असून सकाळी उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माधव प्रभू व केएलईचे अन्य डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
याचदिवशी सायंकाळी 5 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे ‘गीत, संगीत, नृत्य व नाटय़ यांचा संगम असणारा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम होणार आहे. उद्घाटक म्हणून किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत. याची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन प्रा. अनिल चौधरी यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन धनश्री गुरव यांनी केले आहे. या कार्यक्रमात 30 कलाकार असून संगीत आणि वाद्याची साथ संतोष गुरव, विजय नरगुंद (सांगली), स्नेहल जाधव व पंडित विनायक नाईक (मुंबई) हे करतील. सूत्रसंचालन प्रा. अनिल चौधरी व श्रेया हुद्दार यांचे आहे.
या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका लोकमान्य सोसायटीच्या गुरुवारपेठ, टिळकवाडी येथील कार्यालयात व लोकमान्य रंगमंदिर येथे उपलब्ध असून एका व्यक्तीस एकच प्रवेशिका देण्यात येईल. हा कार्यक्रम लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने प्रायोजित केला असून मराठी भाषा प्रेमी मंडळ, संलग्न संस्था बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ शाखा बेळगाव हे सहप्रायोजक आहेत. कार्यक्रमाची निर्मिती रसिक रंजन बेळगावने केली आहे. कोविड नियमानुसार हा कार्यक्रम होईल.









