नेरुरच्या युवकांनी बनविलेले मॉडेल ठरले आकर्षण
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर फावल्या वेळेमध्ये कोणी कविता, कोणी कोरोना जनजागृती व्हिडिओ, कोणी डान्स स्पर्धा, कथा लिहिणे, टिकटॉक व्हिडिओ बनविणे असे छंद जोपासले आहेत. यात तरुणाई आघाडीवर आहे. अशीच नेरुर येथील चार युवकांनी एकत्र येऊन जुन्या सायकलला मॉडिफाय करून चक्क बाईकचा आकार दिला आणि ती सायकलबाईक आज सगळीकडे आकर्षण ठरली आहे.
जिल्हय़ातील कलेचे माहेरघर असलेल्या नेरुर गावातील चार युवकांनी एकत्र येत आपल्या जुन्या सायकलला बाईकचा लूक दिला आहे. ही सायकल जेव्हा आपण पाहतो, तेव्हा ती समोर बाईकच आहे, असा भास होतो. नेरुरमधील अमित मेस्त्राr यांना ही अशी कल्पना सूचली. त्याने ती आपले मित्र ओमकार मेस्त्राr, तुषार मेस्त्राr, मंदार मेस्त्राr यांना बोलून दाखविली. काही क्षणातच मग बाईकची कल्पना सत्यात उतरविण्याचे या चौघांनी ठरविले.
एक जुनी सायकल घेण्यात आली. या नंतर तिला वेल्डिंग करून काही आकार मोल्ड केले गेले. नंतर साधे कापड वापरून आणि त्यानंतर पेपरवर्क करून त्यावर कलर केला गेला. हे सर्व वर्क करण्यासाठी मुख्य कारागिर म्हणून ओमकार मेस्त्राr, तुषार मेस्त्राr, मंदार मेस्त्राr यांनी सतत पाच दिवस अतोनात मेहनत घेतली. पाच दिवसानंतर या सायकलचे रुपांतर बाईकमध्ये करण्यात हे युवक यशस्वी झाले. लॉकडाऊनमध्ये टाईमपास म्हणून करत असलेला छंद त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून गेला आहे. या सायकल बाईकला नंबर प्लेट दिली असून ती एमएच 07 एसी 2020 आहे. बाईक समोर लिहिले आहे, श्री कलेश्वर कृपा आणि कंपनीचे नाव दिले आहे, कलेश्वर आर्टस् नेरुर, सुतारवाडी आणि मॉडेलला नाव दिले आहे, ‘गँग स्काय रॉक.’
आजही ही सायकल बाईक रस्त्यावर हे युवक चालवित असून पाहणाऱयाला मात्र बाईक चालवित असल्याचा भास होतो आहे. या परिसरात सर्वत्र या सायकल बाईकचे कौतुक होत असताना ती बनविण्यासाठी या चार युवकांनी जे प्रयत्न केले, त्यांच्या कलेचेही कौतुक होत आहे. तर हे सर्व मित्र सर्व क्षेत्रात कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ही सायकल बाईक पाहून या युवकांना तशीच सायकल बनवून देण्यासाठी मोठी मागणी येत असल्याचे अमित मेस्त्राr यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. काही दिवसांपूर्वी अजय देवगणच्या ‘टारझन द वंडर कार’ या सिनेमात आपण जुन्या जळालेल्या कारच्या एका सांगाडय़ाला त्या सिनेमातील हिरोने मॉडिफाय करून एक आलिशान कार बनविल्याचे सिनेमामध्ये पाहिले होते. या युवकाने जुन्या सायकलला मॉडिफिकेशन करून आधुनिक बाईकचे स्वरुप दिल्याने या सिनेमातील त्या कारची आठवण होत आहे.









