प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन सुरू झाल्याने सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. यामुळे रोजच्या रोज राबून घर चालविणाऱया दिव्यांगांची परवड होत आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींनी काही ठिकाणी भाजी तर काही ठिकाणी फळे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पोटापाण्यासाठी या व्यक्ती असे व्यवसाय करून आपले जीवन जगत आहेत.
जिमखाना रोडवर बैलहोंगल येथील एक दिव्यांग व्यक्ती मागील काही दिवसांपासून गाडीवरून फळे विकत आहे. दिवसभरात आंबे तसेच इतर फळे विकून आपले कुटुंब चालवत आहे. काही वेळा फळांची विक्रीच होत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.









