ट्रायने पत्र पाठवत दूरसंचार कंपन्यांना दिल्या सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाचा वाढत्या विळख्यामुळे देशात एकूण 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. यामध्येच प्रीपेड ग्राहकांना फोत रिचार्ज करण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. ती होऊ नये यासाठी मोबाईल कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनचा कालावधीची मर्यादा वाढविण्यासाठीचे निर्देश भारतीय टेलिकॉम रेग्यलेटरने दिले आहे.
ट्रायने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांना पत्र लिहून सर्व प्रीपेड ग्राहकांच्या प्लॅनची मर्यादा वाढविण्याचे आदेश दिले आहेत. ट्रायन्sलिकॉमसाठी आवश्यक असणाऱया सर्व सेवा लॉकडाउनपासून वेगळय़ा ठेवण्यात आल्या आहेत. ट्रायने कंपन्यांना सांगितले आहे. की ग्राहकांना कोणत्याही अडचणी शिवाय ही सेवा कायम ठेवण्याच्या सुचना दूरसंचार कंपन्यांना दिल्या आहेत. या सर्व प्रकरणात दूरसंचार कंपन्यांनी ट्रायच्या पत्राला कोणतेही उतर दिलेले नाही. व कोणत्याही प्ररकारची प्लॅनची मर्यादा वाढविली आहे की नाही याचा खुलासा केलेला नाही. मात्र ट्रायच्या सूचनांमुळे सर्वसामान्य मोबाईल सेवा ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ग्राहकांची समस्या
सध्या लॉकडाउनमुळे दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांना मोठय़ा अडचणी निर्माण होत आहेत. कारण बाजारपेठा बंद असल्यामुळे ग्राहकांना रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे मोठी समस्या ग्राहकांसमोर आहे. याचा फटका अडचणीच्या वेळी संवाद करताना मोठी संकट निर्माण होत असल्याचेही ट्रायने म्हटले आहे.
एअरटेलने प्लॅनची मर्यादा 17 एप्रिलपर्यंत वाढविली
एअरटेल कंपनीने कमी उत्पन्न असणाऱया ग्राहकांसाठी लॉकडाउनच्या काळात आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे मोबाईलमधील रिचार्ज संपल्यामुळे अनेक सर्वसामान्य ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. यावर एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना मोफत 10 रुपयाचे टॉकटाईम देण्यात येणार आहे. सोबत सदर प्लॅनचा कालावधी समाप्त झाल्यानंतरही तो येत्या 17 एप्रिलपर्यंत इनकमिंग कॉलची सुविधा मिळणार आहे. याच फायदा 8 कोटी प्रीपेड ग्राहकांना फायदा मिळणार आहे. याचा लाभ ग्राहकांना येत्या 48 तासानंतर उपलब्ध होणार आहे. ट्रायच्या आदेशानंतर एअरटेलने हा निर्णय घेतला.