66 हून अधिक गाळेधारकांची अनामत रक्कम मनपाने गोठविली : सर्व गाळय़ांचा फेर लिलाव 7 ऑक्टोबरपासून
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेने महसूल वाढीसाठी मागील वषी 87 गाळय़ांचा लिलाव केला होता. मात्र यापैकी काही मोजक्मयाच गाळेधारकांनी अनामत रक्कम भरणा करून गाळय़ांचा ताबा घेतला. मात्र 66 हून अधिक गाळेधारकांनी अनामत रक्कम भरणा केली नसल्याने भरलेली रक्कम महापालिकेने जप्त केली आहे. संपूर्ण अनामत रक्कम भरणा केल्यानंतरच पुढील महिन्यात होणाऱया लिलावात भाग घेता येणार आहे.
महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुल आणि खुल्या जागांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. मात्र यापूर्वी भाडेतत्वावर देण्यात आलेल्या असंख्य जागांच्या भाडे कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे मागील वषी 102 गाळय़ांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. यापैकी 87 गाळय़ांना बोली लावण्यात आली होती. सर्वाधिक बोली लावलेल्या गाळेधारकाना गाळे मंजूर करून अनामत रक्कम भरण्याची सूचना करण्यात आली होती. काही गाळय़ांसाठी 25 हजार तर महात्मा फुले भाजीमार्केटमधील गाळय़ांना 50 हजार रूपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली होती. तसेच अनगोळ व अन्य ठिकाणी असलेल्या गाळय़ांसाठी 2 लाख रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली होती. मात्र लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी 50 हजार रूपये अनामत रक्कम भरण्याची अट घालण्यात आली होती. असंख्य व्यावसायिकांनी 50 हजार रूपये भरून लिलाव प्रक्रिकेत भाग घेतला होता. यापैकी सर्वाधिक बोली लावलेल्या गाळेधारकांना गाळे देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता.
लिलावावेळी भरलेली अनामत रक्कम महापालिकेकडून जप्त
तसेच उर्वरित अनामत रक्कम भरण्याची नोटीस बजावली होते. मात्र गाळेधारकांनी उर्वरित अनामत रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे महापालिकेच्या महसूल विभागाने दुसऱयांदा नोटीस बजावून अनामत रक्कम भरण्याची सूचना केली होती. तरी देखील ही रक्कम भरणा केली नसल्याने गाळे मंजूर झालेल्या 66 गाळेधारकांनी लिलावावेळी भरलेली अनामत रक्कम महापालिकेने जप्त केली आहे. पण महात्मा फुले भाजीमार्केट व विविध ठिकाणाचे गाळे व्यवसायिक वापरत आहेत. गाळेधारकांची रक्कम जप्त केल्याने महापालिकेच्या खजिन्यात 15 लाख रूपये जमा झाले आहेत. मात्र 87 गाळय़ांच्या माध्यमातून मिळणाऱया वर्षभराच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे.
सर्व गाळय़ांचा फेर लिलाव 7 ऑक्टोबरपासून अनामत रक्कम भरणा केली नसल्याने सर्व गाळय़ांचा फेर लिलाव करण्यात येणार आहे. दि. 7 ऑक्टोबरपासून लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. मात्र लिलावाच्या अटींमध्ये काही बदल करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. गाळय़ासाठी ठरविण्यात आलेली संपूर्ण अनामत रक्कम लिलावावेळी जमा केल्यासच लिलावात भाग घेता येणार आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत बोली लावणाऱयांची संख्या कमी होण्याची शक्मयता आहे. काही गाळय़ांसाठी 25 हजार रुपयांना व महापालिकेच्या नियमानुसार काही गाळय़ांसाठी 50 हजार ते 5 लाखापर्यंत अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ही अनामत रक्कम भरणा केल्यासच बोलीमध्ये भाग घेता येणार आहे. काही गाळय़ांसाठी 2 लाख रूपये अनामत रक्कम असल्याने ही रक्कम भरणा केल्यानंतरच बोलीमध्ये भाग घेता येणार आहे.









