लिंबू आणि गरम पाण्याला चमत्कारिक पेय मानले जाते. या पेयाचे फायदे अनेक आहेत, असे सांगितले जाते. सकाळी उठल्याबरोबर नियमितपणे लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
- उल्लेखनीय म्हणजे, गरम पाण्यात लिंबाचा रस घालून ते प्यायल्याने आपली पाचनशक्ती वाढते.
- असे असले तरी हे मिश्र पेय आपल्या दातांसाठी योग्य नाही, असा इशारा एक नव्या संशोधनात देण्यात आला आहे.
- यूकेमधील डेंटल सुईटस् क्लिनिकचे डॉक्टर राहा यांनी याबाबत सांगतात की, गरम पाणी आणि लिंबू हे पेय दातांवरील आवरण ‘इनॅमल’साठी नुकसानकारक आहे. यामुळे दातांवरील पिवळेपणा वाढतो. त्याबरोबरच ‘सेन्सेटिव्हिटी’ची समस्या वाढते.
- लिंबात असणार्या ऍसिडमुळे दातांवरील ‘इनॅमल’या आवरणाला धोका निर्माण होतो. असे ऍसिडिक ड्रिंक्स सातत्याने घेतल्याने दातांमधील आंतरिक आवरण ‘डेंटाईन’लाही धोका उत्पन्न होतो.
- तसेच सकाळी उठताच गरम पाणी, लिंबू रस घेतो आणि थोडय़ा वेळाने ब्रश करतो, यामुळेही दातांच्या संरक्षक आवरणांचे नुकसान होते. यामुळे असे मिश्रण सातत्याने न घेणे हाच यावरील पर्याय आहे.
- मात्र, लिंबू पाणी घेतल्यानंतर किमान दोन तासांनंतर ब्रश केल्यास दातांचे नुकसान कमी होण्यास मदत मिळते.









