ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील 25 आरोपींची दिल्ली क्राईम ब्रँचने छायाचित्रांच्या माध्यमातून ओळख पटवली आहे. 200 हून अधिक व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने आरोपींची ओळख पटली आहे. त्यात दीप सिद्धूचाही समावेश आहे.
लाल किल्ल्यावरील हिंसाचारात सहभागी असलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सर्वसामान्य जनतेला आणि प्रसारमाध्यमांना व्हिडिओ आणि छायाचित्र शेअर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, दिल्ली पोलिसांनानागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराचे व्हिडिओ दिले होते.
गुन्हे शाखेच्या एसआयटीने फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने व्हिडिओ आणि छायाचित्रे तपासली. त्यानंतर 25 संशयित गुन्हेगारांची ओळख पटवता आली. छायाचित्रांमध्ये लोक काठ्या, फरसा आणि तलवारी घेऊन दिसतात.









