बेल बॉटम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘बेल बॉटम’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. ट्रेलर पाहिल्यावर लोक यातील एका व्यक्तिरेखेबद्दल चचां करत आहेत. पण ट्रेलरमधील लारा दत्ताच्या ट्रान्सफॉर्मेशनने लोकांना थक्क करून सोडले आहे. ट्रेलरमध्ये लाराला ओळखणे अवघड आहे.

या चित्रपटात लारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. याकरता लाराने मोठी मेहनत केली आहे. या व्यक्तिरेखेसाठी लाराने प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली आहे. सोशल मीडियावर लारा आणि तिच्या मेकअप आर्टिस्टचे कौतुक केले जात आहे. इंदिरा गांधींच्या व्यक्तिरेखेत लारा शोभून दिसत असल्याचे म्हटले जात आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट 3डीमध्ये प्रदर्शित होणार आहे. विमान अपहरणाच्या सत्य घटनेवर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटात हुमा कुरैशी देखील दिसून येणार आहे.









