प्रतिनिधी/ सातारा, फलटण
सातारा जिल्हावासियांनी डेल्टा या व्हेरियंटला परतवून लावले. आला कधी अन् गेला कधी हे सुद्धा समजले नाही. जिह्यातील सुमारे 30 लाख लोकांनी डेल्टापासून बरे झाले असून या जिह्यात ओमायक्रोनची भीती नको आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोन 42 देशात वेगाने पसरला असला तरीही केवळ एकाचा बळी गेला आहे. तरीही त्याची धास्ती लागून राहिली आहे. लाटाप्रिय लोकांना या व्हेरियंटची उकळी फुटली असून प्रशासनाला हा आवडत आहे. फलटणमध्ये जे ओमायक्रोनचे तीन बाधित आढळून आले आहेत त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. परंतु तीन रुग्ण सापडल्याने प्रशासन मात्र विनाकारणच सिरियस झाले आहे.
युगांडा येथून फलटण येथे आलेल्या एकाच कुटुंबातील तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने फलटण तालुक्यासह जिल्हय़ात ओमायक्रॉनने प्रवेश केला आहे. मात्र याने घाबरुन जाण्यासारखे काही नाही. नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.
डेल्टाला हरवणाऱया जिह्यात ओमायक्रोनची विनाकारण धास्ती
भारतातून जगात व्हायरल झालेला डेल्टा या व्हेरियंटची मध्यंतरी चांगलीच जगाने भीती घेतली होती. जगात अनेक देशाने त्यावेळी भारतातून येणाऱयाना त्यावेळी मनाई केली होती. त्यावेळी सातारा जिह्यातील 30 लाख जणांनी या व्हेरियंटवर विजय मिळवला होता. आता मात्र नुकताच पदार्पण केलेल्या ओमायक्रोनची नुसतीच धास्ती वाढवली गेली आहे.
लाटाप्रियवाल्याना उकळी
कोरोनाचे संकट जगाबरोबर जिह्यात आले अन जिल्हा दहा ते पंधरा वर्षे मागे गेला. माणसं माणसपासून दुरावली गेली. पहिली लाट, दुसरी लाट अशा लाटा प्रिय असणाया मंडळींना ओमायक्रोन आल्याची उकळी फुटली आहे. हाच व्हेरियंट प्रशासनाला आवडू लागला आहे.
फलटणचे तिन्ही बाधितांची प्रकृती चांगली
कंपला युगांडा येथून एकाच कुटुंबातील चार जण दि. 9 रोजी फलटण येथील लक्ष्मीनगर येथे आले होते. त्यांची माहिती आरोग्य विभागास मिळाल्याने आरोग्य विभागाने त्यांची आरटीपीसीआर टेस्ट दि. 13 रोजी करण्यात आली होती. त्यामध्ये तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले तर एकाची टेस्ट इन कॅनकलुझीव्ह आली. त्यानंतर आरटीपीसीआर लॅब मार्फत रुग्णाचे नमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळा येथे पाठवले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला. त्यामध्ये तिघांना बाधा असल्याचे निदर्शनास आले. चौथा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे. हे सर्व फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष कक्षात विलीनीकरण दि. 13 पासून आहेत. या चारही जणांचे प्रकृती चांगली आहे. त्यांच्या जवळच्याचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. जनतेने ओमायक्रोनची भीती बाळगू नये, तथापि कोरोना संबंधी सर्व नियमांचे व सूचनांचे पालन करावे, सर्वांनी प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. तसेच परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांनी होम कॉरंटाईन होऊन कोव्हिडं 19 ची तपासणी करून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी आवाहन केले आहे.








