वृत्त संस्था/ सेरब्रुकेन (जर्मनी)
येथे सुरू असलेल्या हायलो खुल्या सुपर 500 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पुरूष एकेरीची उपांत्य फेरी गाठताना आयर्लंडच्या व्ही.कुनलेयुटचा पराभव केला.
शुक्रवारी रात्री खेळविण्यात आलेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 21 व्या मानांकित लक्ष्य सेनने थायलंडच्या व्ही. कुनलेयुटचा 21-18, 12-21, 21-19 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतने पुरूष एकेरीची यापूर्वीच उपांत्य फेरी गाठताना हाँगकाँगच्या अँगसचा पराभव केला. 2019 साली या स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा 20 वर्षीय लक्ष्य सेनचा सिंगापूरच्या लोव्ह येयूविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना होईल. 2019 च्या बॅडमिंटन हंगामात लक्ष्य सेनने पाच स्पर्धा जिंकल्या. पण, त्याला यावर्षी डेन्मार्क तसेच प्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे दुसऱया आणि उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.









