वार्ताहर /हरमल
गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा मांदे मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा वाढदिन रविवारी साधेपणाने साजरा करण्यात आला.
गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे, संघटक सतीश धोंड तसेच मांदे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी कोविड अटींचे पालन करून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर याना कॉलेज सभागृहात शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यातील महनीय व्यक्ती तसेच संध्याकाळपर्यंत मतदारसंघातील व राज्यातील हितचिंतक व कार्यकर्त्यांनी कोविड नियमांचे पालन करून शुभेच्छा दिल्या.









