ऑक्सफोर्ड आणि एस्ट्राजेनेकाच्या लसीच्या चाचणीचा पहिला पूर्ण अहवाल लॅन्सेट या आरोग्यविषयक नियतकालिकाने प्रकाशित केला आहे. जगातील कुठल्याही लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीनंतर प्रकाशित झालेला हा पहिला अहवाल आहे. यानुसार चाचणीत सामील 24 हजार जणांपैकी केवळ 3 जणांवर याचा सकारात्मक प्रभाव पडलेला नाही. तसेच ही लस टोचून घेतल्यावर एकाही स्वयंसेवकाला रुग्णालयात दाखल करावे लागलेले नाही. कोवॅक्सिन लक्षणरहित संक्रमण रोखण्यासह 27 टक्के प्रभावी ठरली आहे.
लॅन्सेटनुसार ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये 11 हजार 636 जण चाचण्यांमध्ये सामील झाले. यातील 5,807 लस गटात सामील होते, ज्यांना पूर्ण डोस देण्यात आला, तर 5,829 लोक नियंत्रण गटात होते, ज्यांना प्रथम अर्धा डोस आणि नंतर पूर्ण डोस देण्यात आला आहे. या चाचणीत लस 70 टक्क्यांपर्यंत प्रभावी राहिली आहे.

अनेक देशांमध्ये वापराची तयारी
ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका कंपनी अनेक देशांच्या नियामकाकडून लसीला मंजुरी देण्याची मागणी करत आहेत. त्यांनी ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये स्वतःच्या लसीवर झालेल्या चाचण्यांच्या आधारावर त्याच्या वापराची अनुमती देण्याची मागणी केली आहे. ऑक्सफोर्डने पूर्वीच्या चाचण्यांच्या आधारावर कोवॅक्सिन 62 टक्क्यांपर्यंत प्रभावोत्पादक असल्याचे म्हटले होते. ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेची नियामकीय यंत्रणा आता लसीला मंजुरी देण्यासंबंधी निर्णय घेणार आहेत.
काही जणांना निम्मा डोस
ऑक्सफोर्ड विद्यापीठाने एका चाचणीत काही लोकांना चुकून निम्मा डोस दिला होता. त्यानंतर संबंधितांवर याचा अधिक प्रभाव झाला आहे. लसीचे दोन पूर्ण डोस दिल्याने ती चांगले काम करेल असे संशोधकांना पूर्वी वाटत होते, परंतु एका छोटय़ा गटाला चाचण्यांमध्ये निम्मा डोस देण्यात आला. स्वयंसेवकांच्या ज्या गटाला निम्मा डोस देण्यात आला, त्यात 1,367 जण सामील होते. तसेच त्यांच्यात कुणच 55 वर्षांपेक्षा अधिक वयाचा नव्हता.
जगासाठी महत्त्वपूर्ण लस
ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस जगासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्याची निर्मिती व वितरण अन्य लसींच्या तुलनेत सोपे आहे. तसेच याची साठवणूक करण्यासाठी अत्यल्प तापमान राखण्याचीही गरज नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोवॅक्स कार्यक्रमाच्या अंतर्गत या लसीचे 300 कोटी डोस तयार केले जाणार असून ते जगभरात पुरविण्यात येणार आहेत. ब्रिटनने या लसीच्या 1 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. यातील 40 लाख डोस तेथे पोहोचले देखील आहेत.









