प्रतिनिधी /पर्वरी
पर्वरीचे भाजपचे भावी आमदार गेल्या महिन्याभर पायाला भिंगरी बांधल्या सारखे पर्वरीचा चप्पाचप्पा पिंजून काढत घरोघर भेटी देत कार्यकर्त्यांना भेटत असत.रणनीती ,कुटनीती रचण्यात व्यस्त होते.या निवडणूक घाई गडबडीत साहजिकच ‘फेमिली’ साठी पुरेसा वेळ देता येत नव्हता.ही खंत त्यांच्या मनात होती.पण त्याला नाईलाज होता.निवडणूक जिंकणे हा एकमेव ‘अजंडा’ घेऊन मी फिरत होते.काल निवडणूक झाल्यामुळे ही शर्यत थांबली आहे.
त्यामुळे आज तो सर्व ताण विसरून सर्व वेळ निवांत माझ्या कुटुंबीय समवेत चहा पीत घालविला. माझे निवडणूक जिंकणे हे एकमेव लक्ष असले तरी मी हे सर्व पर्वरी आणि गोवावासीयांच्या प्रेमापोटी करत आहे. कारण समाजातील दिनादुबले लोक हे माझेच बांधव आहेत.त्यांचाकडून मला प्रेम आधार मिळत आहे.त्यांच्या ऋणाची मी समाजसेवा करून परत फेड करण्याचा प्रयत्न करीत आहे.गोवा हे राज्य प्रगतीपथावर नेण्याचे माझे स्वप्न आहे आणि या स्वप्नाला ही जनताच बळ देणार आहे.त्यासाठी मी जिंकून येण्यासाठी गेला महिनाभर अहोरात्र परिश्रम घेतले आहेत.त्यांचाच आशिर्वादाने मी येणारी निवडणूक निश्चित विजयी होणार आहे. पण आज मी सर्व वेळ माझ्या कुटुंबीय समवेत घालविला.कितीतरी दिवसांनी मी त्यांच्या समवेत जेवणाचा आस्वाद घेतला. असे खंवटे यांनी सांगितले.









