वृत्तसंस्था/ लंडन
पोर्तुगालचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील मँचेस्टर युनायटेड क्लब तातडीने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सदर माहिती मंगळवारी मँचेस्टर युनायटेडच्या वरि÷ अधिकाऱयाने दिली आहे.
रोनाल्डोने या क्लबशी परस्पर सहमतीने करार झाल्यानंतर त्याने मँचेस्टर युनायटेडला निरोप देण्याचे निश्चित केले आहे. मँचेस्टर युनायटेड क्लबकडून दुसऱयांदा करारबद्ध झाल्यानंतर रोनाल्डोने 54 सामन्यातून 27 गोल केले. यापूर्वीही त्याने एकदा या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने या क्लबकडून खेळताना 346 सामन्यांत 145 गोल नोंदवले आहेत. आता हा करार संपुष्टात आल्याची घोषणा या क्लबच्या व्यवस्थापन समितीने करताना त्याचे आभारही मानले आहेत.
त्याने अलीकडेच एका टीव्ही मुलाखतीत मँचेस्टर युनायटेडचे बोर्ड व व्यवस्थापक एरिक टेन हॅग यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळीच तो हा क्लब सोडणार असल्याचे स्पष्ट झाले होते. रोनाल्डोने आतापर्यंत पाचवेळा बॅलन डीओर पुरस्कार मिळविला आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगालचा सलामीचा सामना घानाबरोबर गुरुवारी खेळविला जाणार आहे.









