तिकिटसह अन्य पडताळणी होणार
नवी दिल्ली
आतापर्यंत रेल्वे स्थानकांवर ऑटोमेटिक तिकीट खिडकी मशीन बसवल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु यामध्ये एक पाऊल पुढे टाकत ऑटोमेटिक तिकीट तपासणी मशीन रेल्वे स्थानकांवर बसविणार असल्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. सध्या प्रायोगिक पातळीवर मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्थानकावर हे मशीन बसवण्यात आल्याचे म्हटले आहे. हे मशीन फक्त तिकिटाची तपासणीच न करता ते शरीराचे तापमान तपासणी, फेस मास्क आदींची पडताळणी करते.
सदरचा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य रेल्वे स्थानकांवर ही मशीन्स बसवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये फक्त तिकिट तपासणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. कोविड19मुळे वैयक्तिक सुरक्षा लक्षात घेत हा बदल करण्यात अलाय.









