रेल्वे स्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे शुक्रवारी खबरदारी म्हणून हे कार्यालय बंद करण्यात आले होते.शुक्रवार, शनिवार व रविवार कार्यालय बंद ठेवल्यानंतर सोमवारी सुरू करण्यात आले.
संपुर्ण कार्यालयाचा परिसर सॅनिटाइज करण्यात आला. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला थर्मल स्किनिंग करूनच प्रवेश देण्यात येत होता.नवीन वीज मीटर कनेक्शन, बिल भरणे यासह इतर कामांसाठी कार्यालय खुले करण्यात आले.









