शौविक-मिरांडा सॅम्युअल, दिपेश सावंतच्या चौकशीतून रिया चक्रवर्तीचे नाव समोर
प्रतिनिधी/ मुंबई
बॉलिवुड दिवंगत अभिनेता सुशांतसिंह रजपूत मृत्युप्रकरणी एनसीबी आणि सीबीआयने जोरदार चक्रे फिरवित अटकसत्र सुरू केले असून, याप्रकरणी अखेर तब्बल 66 दिवसानंतर सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीला अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. रियाच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाल्याने, तिचा या प्रकरणात सहभाग आढळल्याने, तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे एनसीबी अ]िधकाऱयाने सांगितले.
त्याचप्रमाणे सीबीआयने शनिवारी दिपेश सावंत, स्मिता पारेख, राधिका नेहलानी, संदीप सिंह यांची चौकशी केली असता, दिपेशला सोडून देण्यात आले. मात्र दिपेशला एनसीबीने ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता, त्याने रिया आणि शौविकच्या सांगण्यावर ड्रग्जची सॅम्यअल मिरांडाकडून ने-आण करीत पैसे दिल्याची कबुली दिली. यामुळे त्याला देखील एनसीबीने अटक केली. तर रविवारी सकाळी एनसीबीचे अधिकारी रियाच्या घरी चौकशीचे समन्स घेऊन पोहोचले. यावेळी रियाला 2 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार रिया एनसीबी कार्यालयात हजर झाल्यानंतर प्रथम तिच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरुवात केली. मात्र प्रत्येकवेळी संशयास्पद आणि चुकीची माहिती देणारी रिया एनसीबीला सहकार्य करीत नव्हती. अशातच एनसीबीने शौविक-सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि रियाची आमने-सामने चौकशी केली असता, यावेळी रियाने अनेक गुन्हय़ांची कबुली दिली.
त्याचप्रमाणे, बॉलिवुडमधील ड्रग्ज कनेक्शन त्याचप्रमाणे ड्रग्जची जादा मात्रा आवश्यक असल्यास ती गौरव आर्याच्या संपर्कात असल्याची कबुली देखील तिने एनसीबी अ]िधकाऱयांना दिली. यामुळे अखेर एनसीबीने रियाला अटक केली. सोमवारी तिला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, याप्रकरणी तिच्या चौकशीतून मोठय़ा धेंडय़ांची नावे समोर येण्याची शक्यता असल्याने, तिच्या एनसीबी कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱयाने दिली. दरम्यान, दिपेश सावंतला देखील 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असून, त्याने रियाचा केलेला भांडाफोडच्या आधारे एनसीबीने प्रश्नांची सरबत्ती रियावर केली. यातील काही विचारलेले प्रश्न पुढीलप्रमाणे,
1) तू कोणाकरिता अंमली पदार्थ खरेदी करत होतीस?
2) तू अंमली पदार्थ कोणाकडून खरेदी करायचीस?
3) तू जे अंमली पदार्थ खरेदी करायची त्याचे पैसे कसे आणि कोण द्यायचे?
4) 15 मार्च 2020 या दिवशी तुझे आणि शौविकचे चॅटिंग आहे त्यात तू अंमली पदार्थांची मागणी कोणाकरिता करतेस?
5) तू सर्वात आधी कधी आणि कोणते अंमली पदार्थ घेतले होते?
6) तुझा भाऊ तुझ्या सांगण्यावरून अंमली पदार्थ आणायचा की, शौविकच्या संपर्कात आल्यानंतर तू अंमली पदार्थ घेऊ लागली?
7) सुशांत अंमली पदार्थ घेतो हे तुला कधी समजले?
8) सुशांत अंमली पदार्थ घेतो हे तुला कळाल्यावर तू त्याला रोखले का नाही? तू शौविकच्या माध्यमातून सुशांतकरिता अंमली पदार्थ खरेदी करायचीस का?
9) सुशांत कोणाकडून अंमली पदार्थ मागवायचा?
10) सुशांतला कोण अंमली पदार्थ द्यायचे?
11) सुशांतची तब्येत बरी नव्हती आणि तो अंमली पदार्थ घेत होता तर तू त्याला रोखले का नाही?
12) गौरव आर्या आणि तू कसे संपर्कात आलात ?
अशा प्रकारची सरबत्ती केल्याने, गांगरुन गेलेल्या रियाने सर्व गुन्हय़ाची कबुली दिली. दरम्यान, एनसीबीने शुक्रवारी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली. दोघांनाही 9 सप्टेंबरपर्यंत रिमांडवर ठेवण्यात आले आहे. शनिवारी दिपेश सावंत यालाही अटक करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी वांद्रे येथून आरोपी ड्रग डिलर झैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांना अटक केली. या दोघांनाही 9 सप्टेंबरपर्यंत रिमांडवर ठेवण्यात आले आहे. एनसीबीने कैझान इब्राहिम नावाच्या ड्रग डिलरला अटक केली होती. पण शनिवारी त्याला जामीन मिळाला.









