तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
केंद्र सरकारने कांद्यावर पुन्हा निर्यात बंदी घातल्यामुळे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने कांदा पाठवला आहे.
केंद्र सरकारने 4 जून रोजी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा हे पिक वगळले होते. मात्र तीन महिन्यातच कांद्यावर पुन्हा निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. भविष्यात यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील, अशी भिती देखील वाटते. तेव्हा केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्यावी, यासाठी आज शनिवारी सोलापूर शहराच्या वतीने कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी सोलापूर राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे शेतकरी विरोधी कांदा निर्यातबंदीचा निषेध व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कांद्याची भेट पाठवण्यात आली आहेत.
यावेळी नॅशनल जनरल सेक्रेटरी सायरा शेख, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष आरती हुळळे, बयुवती कार्याध्यक्ष सुप्रिया लोमटे आदी उपस्थित होते.








