रविवार दि.15 ते शनिवार दि.21 ऑगस्ट 2021
मेष
या सप्ताहात सिंहेत सूर्यप्रवेश, बुध, मंगळ युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला व्यवहारात सावध रहा. पर्स सांभाळा. आपसात मतभेद होतील. संसारात खर्च व चिंता वाढेल. नोकरीत तुमच्यावर नवीन कामाची जबाबदारी देण्यात येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील समस्या सोडवण्यासाठी संयम ठेवावा लागेल. मैत्रीत वाद होईल. स्पर्धेत पुढे जाल.
वृषभ
या सप्ताहात सिंहेत सूर्यप्रवेश, सूर्य, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात कायदा मोडू नका. हिशेब नीट करा. नोकरीत काम वाढेल. संसारात जवळच्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवे संबंध तयार होतील. स्पर्धेत मेहनत घ्या. जिद्द ठेवा. वाहन हळू चालवा.
मिथुन
या सप्ताहात सिंहेत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात परिस्थिती बदलण्याची घाई करू नका. कायदा पाळा, अहंकार ठेवू नका. नोकरीत कामे वाढतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची वाढलेली प्रति÷ा, लोकप्रियता विरोधकांना सहन होणार नाही. कुरापती वाढतील. स्पर्धेत टिकून रहा.
कर्क
या सप्ताहात सिंहेत सूर्यप्रवेश, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. धावपळ, दगदग करावी लागेल. मागील येणे वसूल करा. नोकरीत प्रभाव पडेल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात नवे पद मिळेल. मुलांच्या सुखासाठी विचार कराल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल.
सिंह
या सप्ताहात तुमच्या राशीत सूर्यप्रवेश, बुध-मंगळ युती होत आहे. धंद्यात फायदा होईल. प्रवासात घाई करू नका. नवे काम मिळेल. कोणताही वाद वाढवू नका. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात मागील चुका सुधारण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. विरोधक तुमचा राग वाढवतील. जवळची माणसे मदत करतील.
कन्या
या सप्ताहात सिंहेत राशीत सूर्यप्रवेश, बुध, मंगळ युती होत आहे. गोड बोलून तुम्हाला धंद्यात रहावे लागेल. गिऱहाईकाबरोबर भांडण होईल. प्रवासात घाई करू नका. नोकरीत मान द्यावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या अडचणी वाढतील. तुमच्यावर आरोप येईल. वृद्ध व्यक्तीची चिंता वाढेल. स्पर्धा कठीण आहे.
तुळ
या सप्ताहात सिंहेत सूर्यप्रवेश, बुध, मंगळ युती होत आहे. भावनेच्या आहारी न जाता व्यवहार करा. गोड बोलून तुमच्याकडे पैशाची याचना करणारे लोक येतील. संसारात घरातील माणसांना दुखवू नका. खाण्याची काळजी घ्या. नोकरीत तुमच्या कामाचा प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. जवळची माणसे तुमच्या कार्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील.
वृश्चिक
या सप्ताहात सिंहेत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी बोलण्यात समतोल राखा. धंद्यात नवे काम मिळेल. मागील बाकी वसूल करा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. अनेकांना जवळ करण्यात यश मिळेल. संसारात सौख्य मिळेल.
धनु
या सप्ताहात सिंहेत सूर्यप्रवेश, बुध, मंगळ युती होत आहे. खंबीरपणे धंद्यात वाढ करता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कायदा मोडू नका. नोकरीत खूष कराल. प्रगतीकारक संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात जोमाने कार्य करून दाखवाल. लोकप्रियता मिळेल. स्पर्धेत अव्वल रहाल. कठीण कामे करून घ्या.
मकर
या सप्ताहात सिंहेत सूर्यप्रवेश, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यात वाद वाढवू नका. दादागिरीची भाषा त्रासदायक ठरेल. काम रेंगाळेल. नोकरीत कामाच्या बाबतीत लक्ष द्या. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात घाई करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. टीका करताना चूक करू नका. स्पर्धा कठीण होईल.
कुंभ
या सप्ताहात सिंहेत सूर्यप्रवेश, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यात प्रगती होईल. फायद्याचा जास्त मोह धरू नका. पाकीट सांभाळा. संसारात खर्च वाढेल. क्षुल्लक मतभेद होईल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने तुमचा दौरा पूर्ण करा. जवळच्या लोकांना दुखवू नका. स्पर्धेत पुढे जाल. नवीन ओळख घातकी ठरू शकते.
मीन
या सप्ताहात सिंहेत सूर्यप्रवेश, बुध, मंगळ युती होत आहे. धंद्यात चूक करू नका. कोणताही वाद वाढवू नका. अरेरावीची भाषा घातक ठरेल. नोकरी टीकवा. संसारात वृद्ध व्यक्तीची चिंता वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी निर्माण होतील. आरोप येतील. मोठय़ा व्यक्तींची मदत मिळणे कठीण आहे. प्रेमाने बोला मदत मिळवा.





