रविवार दि.1 ते शनिवार दि.7 ऑगस्ट 2021
मेष
या सप्ताहात बुध, शनि प्रतियुती, शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात किरकोळ अडचण येईल. व्यवहारात घाई गडबड करू नका. मागील येणे वसूल करा. बोलण्यात गोडवा ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या डावपेचांना उधळून लावण्याचा प्रयत्न केला जाईल. करार करताना कोणतीही चूक करू नका. नोकरीत कायदा न मोडता कामे करा. णोठय़ा कामासाठी दूरवरचा प्रवास घडेल. वाहन जपून चालवा.
वृषभ
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. रविवार ताणतणाव होईल. संसारात मतभेद होतील. नोकरीत कामामध्ये वर्चस्व सिद्ध कराल. मैत्रीत सावधपणे व्यवहार करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामे रेंगाळत ठेवू नका. शिक्षणात प्रगती कराल. स्पर्धा जिंकता येईल. आध्यात्मिक अनुभवाचा आनंद घ्याल.
मिथुन
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, हर्षल त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील चर्चा यशस्वी होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्ही कोणताही अंदाज घेताना घाई करू नका. कायदा पाळा. नोकरीत वरिष्ठाचा शब्द प्रमाण मानावा लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. नवीन ओळखीतून कामाला नवे वळण मिळेल. खरेदी विक्रीत फायदा होईल. व्यसनापासून दूर रहा. मित्रांची मदत मिळेल.
कर्क
या सप्ताहात बुध, शनि प्रतियुती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात मनाप्रमाणे कामे मिळतील. वसूली करता येईल. नवीन ओळखी होतील. सप्ताहाच्या मध्यावर वादविवाद होईल. खर्च वाढेल. घरातील कामे रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती कराल. मान, प्रति÷ा मिळेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. स्पर्धा जिंकाल. आरोग्याकडे लक्ष ठेवा.
सिंह
या सप्ताहात सूर्य, शनि प्रतियुती होत आहे. शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात फसगत टाळा. चर्चा करताना रागावर ताबा ठेवा. नोकरीत कामाचा ताण वाढेल. कायद्याच्या कचाटय़ात अडकाल असे भाष्य करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या चुका दाखवण्यात विरोधक पुढाकार घेतील. वरि÷ांच्या विरोधात जाऊन चालणार नाही. नवीन वास्तू घेण्याचा विचार कराल.
कन्या
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, शनि प्रतियुती होत आहे. रविवार मनस्ताप होईल. वादविवाद वाढवू नका. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला नवे पद मिळण्याची शक्मयता आहे. जवळच्या लोकांना कमी समजू नका. देण्या-घेण्याच्या व्यवहारात फसगत टाळा. व्यसन नको. पोटाची काळजी घ्या. स्पर्धा जिंकाल. नातेवाईकांकडून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
तूळ
या सप्ताहात सूर्य, चंद्र, लाभयोग, शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचा ताण वाढेल. कायद्याच्या कचाटय़ात अडकू नका. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक सर्वत्र होईल. नवीन ओळखीमुळे तुम्हाला एखादी चांगली प्रेरणा मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने पुढे जा.
वृश्चिक
या सप्ताहात सूर्य, चंद्र, लाभयोग, बुध, शनि प्रतियुती होत आहे. धंद्यात मोठी संधी मिळेल. मागील थकबाकी वसूल करा. नोकरीत प्रगती कराल. राजकीय, सामाजिक कार्यातील समस्या सोडवण्यात यश मिळेल. चूक सुधारण्याची संधी मिळेल. संसारातील कामे करून घ्या. कौटुंबिक सौख्य मिळेल. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करा. स्पर्धा जिंकाल.
धनु
या सप्ताहात चंद्र, गुरु त्रिकोण योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात तत्परता ठेवा. गोडी गुलाबीने बोलून ध्येय साध्य करा. नोकरीत वरिष्ठाना काटशह देऊ नका. मैत्रीतून चांगली कामे करून घेता येतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे नम्रपणे मांडा. आग्रही भूमिका ठेऊ नका. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल.
मकर
बुध, शनि प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. प्रवासात घाई करू नका. वादाला जास्त महत्त्व दिल्यास धंद्यात तणाव होईल. चातुर्याचे बोल उपयुक्त ठरतील. नोकरीत वर्चस्व राहिल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही योग्य प्रकारे कामे करू शकाल. महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. मैत्रीत, संसारात गैरसमज होईल. खर्च वाढेल. स्पर्धा जिंकाल. शेजाऱयांशी सलोख्याचे संबंध ठेवा.
कुंभ
या सप्ताहात शुक्र, हर्षल त्रिकोण योग, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात चर्चा करताना अरेरावी करून चालणार नाही. कायद्याची कक्षा पाळा. बोलताना सावध रहा. नोकरीत वरि÷ांना कमी लेखू नका. राग आवरा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. प्रति÷ा सांभाळा. विरोधकांना संधी देऊ नका. व्यसनापासून दूर रहा.
मीन
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, शनि प्रतियुती होत आहे. धंद्यात वाढ होईल. पैसा मिळेल. खर्च वाढेल. वस्तूच्या दुरुस्तीवर खर्च करावा लागेल. नवीन ओळखीवर भाळून जाऊ नका. व्यसन नको. खाण्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती कराल. संसारात गैरसमज होईल. वाहन हळू चालवा. तुमच्याविरूध्द कटकारस्थाने सुरू आहेत. तुम्हाला पदावरून हटवण्याचे प्रयत्न होतील. सावध रहा.





