रविवार दि. 21 ते शनिवार दि. 27 मार्च 2021
मेष
बुध, हर्षल लाभयोग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात मोह टाळा. भावनेच्या भरात कोणताही करार करू नका. वस्तू नीट सांभाळा. अनाठायी खर्च होईल. नोकरीत तुमच्याकडे कठीण कामे देण्यात येतील. मित्रांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी निर्माण केल्या जातील. तुमच्यावर नाहक टीका होईल. कुटुंबात कामाचा ताण वाढेल. नम्रता ठेवा, खाण्याची काळजी घ्या.
वृषभ
चंद्र, बुध त्रिकोण योग, सूर्य, शुक्र युती होत आहे. कोणतेही कठीण काम रेंगाळत ठेवू नका. नवीन ओळखी वाढतील. व्यवसायात वाढ होईल. जुने येणे वसूल करा. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्याला गति मिळेल. जनहितांचा कौल तुम्हाला मिळेल. शेतीत फायदा होईल. कर्जाचे काम करून घ्या. कला, क्रीडा साहित्यात प्रगती, प्रसिद्धी, पैसा मिळेल.
मिथुन
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. थकबाकी वसूल करा. मोठय़ा लोकांच्या ओळखीतून कामे मार्गी लावता येतील. नोकरीत प्रभाव वाढेल. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची कामे करून घ्या. लोकप्रियता मिळेल. कला, साहित्यात पुढे जाल. प्रवासात घाई करू नका. पोटाची काळजी घ्या.
कर्क
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, रवि,शुक्र युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला बोलण्यात सावध रहा. धंद्यात हिशोब नीट करा. वाद वाढवू नका. मोठे काम मिळवता येईल. नोकरीतील समस्या कमी होईल. नवीन ओळखी होतील. कला, क्रीडा, साहित्यात प्रसिद्धी मिळेल. कल्पनाशक्ती वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यातील प्रश्न सोडवता येतील. संसारात चांगली घटना घडेल.
सिंह
बुध, हर्षल लाभयोग, मंगळ, शनि त्रिकोण योग होत आहे. धंद्यात गोड बोलून रहा. उधारी वाढवू नका. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नोकरीत काम वाढेल. कामात चूक करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात समस्या वाढतील. आरोप येईल. जवळचे लोक चुका करतील. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेवू नका. प्रकृतीची काळजी घ्या. वस्तू नीट सांभाळा.
कन्या
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, रवि, शुक्र युती होत आहे. सप्ताहाच्या शेवटी व्यावहारिक बोलण्यात फसगत होईल. कठोर शब्द टाळा. नोकरीत प्रभाव पडेल. मागील येणे वसूल करा. धंद्यात वाढ होईल. संसारात आनंदी रहाल. राजकीय, सामाजिक कार्यात मान-प्रति÷ा मिळेल. नवीन कार्याला सुरुवात करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. लेखनात मन रमेल.
तुळ
बुध, हर्षल लाभयोग, चंद,बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात गोड बोला. भावनेच्या, मोहाच्या आहारी न जाता धंदा करा. प्रति÷ा सांभाळा. उधारीवर माल देऊ, घेऊ नका. नवीन ओळखीवर भाळून जाऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात घाई करू नका. नोकरी टिकवा. कामात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. कोणताही वाद वाढवू नका. कायदा मोडू नका.
वृश्चिक
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, सूर्य, शुक्र युती होत आहे. संसारात लक्ष द्या. समस्या सोडवा. मैत्री वाढेल. संतती संबंधी प्रश्न सोडवा. धंद्यात वाढ होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत प्रभाव पडेल. वादाला महत्त्व देऊ नका. कला, साहित्यात प्रगती कराल. ओळखी होतील. कल्पना प्रभावी ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात मोठे यश मिळवाल. स्पर्धा जिंकाल. खरेदी विक्रीत लाभ होईल.
धनु
चंद्र, बुध त्रिकोण योग, सूर्य, शुक्र युती होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. स्वतःच्या उन्नतीकडे लक्ष द्या. प्रेमाला चालना मिळेल. नोकरीत काम वाढले तरी वर्चस्व दाखवता येईल. इतरांच्या गोड बोलण्यावर भाळून जाऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात क्षुल्लक तणाव होईल. प्रसिद्धी मिळेल. नवे स्नेही तयार होतील. संसारात सुखद समाचार मिळेल. खाण्याची काळजी घ्या.
मकर
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळेल. नकळत कोणतीही चूक करू नका. विचार करा. नोकरीत काम वाढेल. गुपित उगड करू नका. राजकीय, सामाजिक कार्याला गती देता येईल. विरोधकांना संधी देऊ नका. छोटीशी चूक नको. बालिशपणाने वागू नका. संसारात चांगली घटना घडेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती कराल. प्रश्न सोडवा.
कुंभ
सूर्य, शुक्र युती, बुध, हर्षल लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर वादग्रस्त परिस्थिती निर्माण होईल. धंद्यात फायदा वाढेल. वसुली करा. नवे काम मिळवा. नोकरीत वरि÷ांना मदत करावी लागेल. ओळखी वाढतील. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचे मुद्दे उपस्थित कराल. प्रसिद्धी मिळेल. रेंगाळलेले कामे करा. कला, क्रीडा, साहित्यात प्रगतीकारक घटना घडेल.
मीन
सूर्य, शुक्र युती, मंगळ, शनि त्रिकोण योग होत आहे. आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल. शुक्रवारी बोलताना काळजी घ्या. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. नोकरीतील गैरसमज दूर करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील तणाव कमी करता येईल. ओळखी वाढतील. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. नवीन पदार्थ शिकाल. प्रेरणादायक घटना, कला, क्रीडा, साहित्यात घडेल. विवाहासाठी स्थळे मिळतील.