वार्ताहर / खोची
जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने रामोशी बेरड समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करून करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस केली पाहिजे. या आणि अन्य मागण्यांसाठी गुरुवार आठ ऑक्टोबर पासून विविध मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना पार्श्वभूमीचा विचार लक्षात घेऊन राज्य सरकारला ३० ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर सर्व मंत्र्यांचे निवासस्थानासमोर “बोंबाबोंब आंदोलन” व “राज्यभर चक्काजाम” आंदोलन करण्याचा इशारा जय मल्हार क्रांती संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष काकासाहेब चव्हाण व राज्य संघटनेचे नेते रोहित मलमे यांनी दिला आहे.
मागील कित्येक वर्षापासून रामोशी बेडर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा. आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या नावे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. रामोशी बेरड-बेडर समाजाचा विकास आराखडा तयार करावा. आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक व बहिर्जी नाईक यांचा क्रांतिकारी इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करावा. रामोशी वतन जमिनी बिनशर्त परत मिळाव्यात. या मागण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलनाचा करण्याचा निर्णय रामोशी समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
साधारण महिनाभर चालणारे आंदोलनात ८ ऑक्टोबर दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करणे. शुक्रवार नऊ ऑक्टोबरला जिल्ह्यातील तीन मंत्री कोल्हापूर जिल्ह्यातील ३ मंत्री व सर्व लोकप्रतिनिधी आमदार व खासदार यांना समाजाचे निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनाचा विचार करून रामोशी समाजाच्या मागण्यांना महिना अखेरपर्यंत न्याय मिळावा. अशी अपेक्षा रोहित मलमे आणि जिल्हाध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









